पिरंगुट स्कूलमध्ये विविध उपक्रम

पिरंगुट- येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त स्वच्छता अभियान, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी प्राचार्य एस. बी. लाडके, पर्यवेक्षिका डी. एस. गायकवाड, एस. व्ही. भोकरे, आर. के. शेंडगे आदी उपस्थित होते. याचे नियोजन उपशिक्षिका एम. व्ही. जगताप, डी. के. माझिरे यांनी केले होते.
यावेळी प्राचार्य एस. बी. लाडके म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे मोठे योगदान आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे दोघांचे गुण होते. त्यांच्या मूल्याचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वापर केला पाहिजे. स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात आयोजित गांधी जयंती आणि अहिंसा दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर झालेल्या गांधी जयंतीच्या कार्यक्रमत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील गांधीजींच्या जिवन आणि कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य डॉ. शेळके म्हणाले, महात्मा गांधींनी आपले संपूर्ण जीवन जनसामान्यांची सेवा करण्यात समर्पित केले. माणूस आणि मानवतावाद हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. भारताला समजून घ्यावयाचे असेल तर गांधीजींच्या विचारांचे वाचन केले पाहिजे. स्वचछ भारत हा त्यांच्या स्वप्नातील भारत आहे.विद्यार्थ्यांनी काम करून शिक्षण घ्यावे, असा त्यांचा मानस होता. सर्व धर्म समभाव हा गांधींच्या विचारांचा सार आहे. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश कांबळे, प्रा. तुकाराम चव्हाण, डॉ. अभय पाटील, प्रा. मेघा पाटोळे, राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व सदस्य अध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)