पिरंगुट ग्रामपंचायतीचे 24 मार्चला मतदान

पिरंगुट- मुळशी तालुक्‍याची औद्योगिक राजधानी असलेल्या पिरंगुट ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून पुढील महिन्यात रविवार, दि. 24 मार्चला मतदान होणार आहे.
पिरंगुट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे संपूर्ण मुळशी तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार आज निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार 24 मार्चला ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. 25 मार्चला मतमोजणी होणार आहे. 5 मार्च ते 9 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते 3 या वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करायचे आहेत. सोमवारी (दि. 11 मार्च) ला नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून, बुधवारी (दि. 13 मार्च) दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येणार आहे. याचदिवशी दुपारी तीननंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)