पिरंगुट इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये आर्ट फेस्टिव्हल

पिरंगुट- येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कुल मध्ये आर्ट फेस्टिव्हल आणि भातुकली प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन मुख्याध्यापिका एस. पी. तावरे यांच्या हस्ते झाले.
आर्ट फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेली विविध प्रकारची चित्रे, मातीपासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू, विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त पणत्यांना केलेली रंगरंगोटी अशा विविध प्रकारच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थिनींनी भातुकली प्रदर्शनात विविध प्रकारची भांडीकुंडी यांची सुंदर मांडणी केली होती. या प्रदर्शनास पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शिक्षिका व्ही. डी. केदारी, ए. एन. गुंड, एस. के. राऊत, एन. एस. लांडगे यांनी याचे नियोजन केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)