पिरंगुटमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

पिरंगुट- येथील टीआरडब्ल्यू कंपनीच्या वतीने पिरंगुट परिसरातील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताह व दक्षता या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. कंपनीचे अरविंद येउरकर व त्यांच्या टीमने मुलांना हे प्रशिक्षण दिले. पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका संगिता पवळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रशिक्षणात मुलांना वाहतूक रहदारीचे नियम, सिग्नल पाळण्याचे महत्त्व, सीट बेल्ट कसा लावला जातो हे गोष्ट रुपाने, खेळ स्वरुपात दाखविण्यात आले. मुलांना पुस्तक, चित्रकला वही, खाऊ व बॅचचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख संतोष मोहोळ, तालुका संघटिका ज्योती चांदेरे, सरपंच वृंदा येनपुरे, विकास पवळे, दैवशाली पवळे, शोभा सावरकर, मुख्याध्यापक राजेंद्र ढगे, सुमन जोरी, शुभांगी पळसकर, संतोष चौधरी, संतोष कंधारे, विकास कोकाटे, अंकुश आखाडे, सुनिता धनगरमाळी, संगिता वाघोले आदी उपस्थित होते. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. एकूण 2000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार असून आतापर्यंत 1300 विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण दिले आहे. उर्वरित 700 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)