पिरंगुटच्या सरपंचपदी सुप्रिया धोत्रे बिनविरोध

पिरंगुट- येथील सरपंचपदी सुप्रिया विशाल धोत्रे यांची बिनविरोध निवड झाली. याआधीच्या सरपंच जनाबाई गोळे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. सरपंच पदासाठी सुप्रिया धोत्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी मावळत्या सरपंच जनाबाई गोळे, उपसरपंच संतोष दगडे, सदस्य राजाभाऊ वाघ, नामदेव बलकवडे, दिलीप पवळे, चांगदेव निकटे, अशोक ओव्हाळ, बापूसाहेब पवळे, शेखर गोळे, सदस्या मनिषा पवळे, मंदा पवळे, छाया पवळे, हेमलता मंडले, शारदा कुंभार, वैशाली नवाळे, ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजने उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी गणेश कदम यांनी काम पाहिले. त्यांच्या निवडीबद्दल माजी सभापती बाळासाहेब पवळे, बाळासाहेब गोळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, गणेश पवळे, चांगदेव पवळे, राजेंद्र गोळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामस्वच्छता व अन्य ग्रामविकासाचे उपक्रम यामध्ये सातत्य ठेवून ग्रामपंचायतीच्या माध्यमाने महिलांना रोजगार उपलब्ध व्हावे याकरीता रोजगार प्रशिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सुप्रिया धोत्रे यांनी निवडीनंतर सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)