पिरंगुटचे सरपंच अवघ्या 26 मतांनी विजयी

चांगदेव पवळे यांनी केला राजाराम वाघ यांचा पराभव

पिरंगुट- थेट जनतेतून निवडून येऊन पिरंगुट ग्रामपंचायतीचे पाहिले सरपंच होण्याचा मान चांगदेव निवृत्ती पवळे यांनी मिळवला आहे. तर प्रतिस्पर्धी उमेदवार राजाराम लक्ष्मण वाघ यांना 26 मतांनी पराभव स्वीकरावा लागला.

मुळशी तालुक्‍याची औद्योगिक राजधानी व सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी पिरंगुटची ओळख आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले होते. एकूण 17 सदस्यांपैकी 13 जागा बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले होते. तर उर्वरीत 4 जागांसाठी मतदान झाले. सरपंचपदासाठी चांगदेव पवळे, राजाराम वाघ व चांगदेव निकटे हे 3 उमेदवार रिंगणात होते. ऐनवेळी चांगदेव निकटे यांनी चांगदेव पवळे यांना पाठिंबा दिल्याने चांगदेव पवळे व राजाराम वाघ यांच्यात सरपंच पदासाठी मुख्य लढत झाली.

शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत अखेर चांगदेव पवळे यांनी बाजी मारली. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत 55 तर सदस्यांच्या 4 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 93 जणांनी नोटाचा पर्याय निवडला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र कांबळे यांनी काम पाहिले.

  • निवडून आलेले व बिनविरोध सदस्य
    विकास पवळे, महेश वाघ, लक्ष्मण निकटे, रामदास गोळे निवडणुकीद्वारे निवडून आले आहेत, तर तेजस्वी उभे, सूवर्णा नवाळे, रेश्‍मा पवळे, सुरेखा पवळे, अश्‍विनी निकटे, छाया पवळे, श्रीकांत केदारी, सारिका केदारी, प्रवीण कुंभार, राहुल पवळे, जनाबाई गोळे, अंकुश खडके, सारिका गोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)