“आरटीई’ ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवली

जुन्नरचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांची माहिती

नारायणगाव- महाराष्ट्र शासनाचा 2019-20 या चालू शैक्षणिक वर्षातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार (25 टक्के -आरटीई ) ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 मार्चपर्यंत वाढविण्यात आलेली असल्याची माहिती जुन्नर तालुक्‍याचे गट शिक्षण आधिकारी पी. एस. मेमाणे यांनी दिली आहे .
महाराष्ट्र शासन अधिसूचना आरटीईनुसार प्राथमिक शिक्षणासाठी 25 टक्के मोफत प्रवेश योजना सुरू केलेली आहे. यामध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत 5 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 पर्यंत होती; पण विविध संघटना आणि पालकांच्या मागणीनुसार ही मुदत 30 मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांनी संबंधित शाळेच्या मदतीने ऑनलाइन फॉर्म भरावेत. आरटीई 2009 अधिनियमान्वये मान्यता प्राप्त विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळांमध्ये वंचित, दुर्बल घटक, आर्थिक दुर्बल घटक,चअपंग विधार्थी, विधवा, घटस्फोटित महिलांची बालके, अनाथ बालके अशा बालकांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येतो. त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण प्रवेश मिळाल्यानंतर मोफत होते. त्यांची फी शासनाकडून प्रतिपूर्तीच्या स्वरूपात देण्यात येते. जुन्नर तालुक्‍यातील पालकांनी संबंधित शाळेच्या मदतीने ऑनलाइन फॉर्म 30 मार्चपर्यंत भरावेत. 30 मार्चनंतर पंचायत समिती जुन्नर येथे ज्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा पालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे, असे आवाहन गटशिक्षण आधिकारी मेमाणे आणि विस्तार आधिकारी अनिता शिंदे यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here