“पिफ’मध्ये रंगला श्रीराम राघवन्‌ आणि तब्बु यांचा संवाद

पुणे – प्रेक्षक खूप बुद्धिमान असल्याने प्रेक्षकांना प्रत्येक गोष्ट सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न करत नाही. त्यांना “कळेल का नाही’ या बाळबोधाने चित्रपट तयार करणे योग्य नाही, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी व्यक्त केले. ते “पिफ फोरम’ मध्ये बोलत होते.

“पिफ फोरम’ आयोजित परिसंवादामध्ये अभिनेत्री तब्बू, लेखिका पूजा लाढा सुरती, “साउंड डिझायनर’ मधू अप्सरा आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि समर नखाते उपस्थित होते. श्रीराम राघवन यांच्याबरोबर काम करणे हे स्वप्न होते, ते पूर्ण झाले. या चित्रपटातील भूमिका रेखाचित्रासारखी न वाटता प्रेक्षकांना विश्‍वास ठेवावा, असे वाटणे गरजेचे होते. त्यामुळे ही भूमिका इतकी आव्हानात्मक असेल मला वाटले नव्हते, असे अभिनेत्री तब्बू म्हणाली.

“मदर इंडिया’, “बंदिनी’, “सुजाता’ आदी चित्रपटांतील स्त्री भूमिका मला खूप भव्यदिव्य वाटतात. त्या काळी “पॅशन’ने चित्रपट बनवले, त्यामुळे ते प्रेक्षकांना भावले, असेही तब्बू म्हणाली. तर, “माझे शिक्षण पुण्यामध्ये झाल्याने पुणे आणि माझे जवळचे नाते आहे,’ असे राघवन्‌ यांनी आवर्जुन सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)