पितृपक्षामुळे भाजीपाला महागला

मागणीत वाढ : आणखी दरवाढ होण्याची शक्‍यता

पिंपरी – पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष. पितृपक्षाच्या पंधरवाड्यास आजपासून (दि.26) सुरूवात झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढल्याने भावात वाढ झाली असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पितृपक्ष पंधरवाड्यात पालेभाज्यांना जास्त मान असतो. यामध्ये मेथी, गवार, भेंडी, कारले, आळूची पाने, लाल माठ, लाल भोपळा या भाजीपाल्याचा समावेश आहे. यामुळे गेल्या आठवड्यात 40 किलो असलेली गवार 80 रूपये किलो झाली आहे. त्यातच गवारीची आवक घटल्याने गवारीचे भाव दुप्पटीने वाढले आहेत. याचबरोबर मेथी 15 ते 20 रूपये गड्‌डी झाली आहे. आळूच्या दोन गड्ड्या 10 रूपयाला विकल्या जात आहेत. लाल भोपळा 20 रूपये किलो आहे. कारले, भेंडीचे भाव 40 ते 50 रूपये किलो झाले आहे. यांचे भाव सध्या स्थिर असले तरी दोन-तीन दिवसांत भाव वाढण्याची शक्‍यता असल्याचे भाजी विक्रेता आसिफ बागवान यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात कोथिंबीरीची गड्डी 10 रूपयाला मिळत होती तिचा भाव 20 रूपये झाला आहे. शिमला मिरचीच्या आवकेमध्ये वाढ झाल्याने तिचा भाव 20 रूपये किलो झाला आहे. अद्रकाची आवक घटल्याने त्याचा भाव 70 ते 80 रूपये किलो झाला आहे. चांगला बटाटा 25 रूपये किलो झाला आहे. गेले दोन दिवस पुण्याचे मार्केट बंद असल्याने त्याचा परिणाम मालाच्या आवकेवर झाला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)