पिता-पुत्र पालखी सोहळ्यांकडून माउलींचे दर्शन

आळंदी- श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे युवराज धर्मवीर संभाजीराजे या पिता-पुत्राची भेट अखेरच्या क्षणी नियतीने होऊ दिली नाही. ही खंत दोन्ही छत्रपतींच्या मनात शेवटपर्यंत तशीच राहिली. म्हणून ही अधुरी राहिलेली भेट व्हावी असा मनी मनसुबा आला आणि हभप बाजीराव महाराज बांगर (शिवचरित्रकार संभाजी चरित्रकार) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य संघाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीराजे व युवराज शंभूराजे भेट पालखी सोहळा अलंकापुरीत श्रीराम धर्मशाळेत मुक्कामी होता. तर बुधवारी (दि. 9) सकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकाराम, शिवबा, तुकारामच्या गजरात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली यांचा आभिषेक शिववंदना व प्रदक्षिणा करून पुढे मार्गस्थ झाला. याप्रसंगी अनेक वारकरी मावळे सहभागी होते. त्यामध्ये माऊली संस्थानचे चोपदार राजाभाऊ चोपदार तसेच बाळासाहेब चोपदार शामकांत निघोट माऊली वंदेकर बाजीराव दुराफे, बाबासाहेब दिघे, आषुतोष भोर, योगेश बांगर, दत्ता येळवंडे, आबा बोराडे, संदीप चिखलठाने, सोपान महाराज निकम, श्रीकांत दुराफे, चांगदेव सावंत, पांडुरंग कराड, दीपक भोईटे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)