पितापुत्रीच्या प्रसंगावधानाने रेल्वे अपघात टळून वाचले 2000 जणांचे प्राण

नवी दिल्ली – एका पितापुत्रीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने भीषण रेल्वे अपघात टळून सुमारे 2,000 लोकांचे प्राण वाचल्याची घटना त्रिपुरा येथे घडली आहे. जंगलातील लाकडे तोडून, ती विकून उदरनिर्वाह करणाऱ्या स्वप्न देव वर्मा आणि त्याची मुलगी सोमती यांनी हा पराक्रम केला आहे. आगरतळा येथे राहणारा स्वप्न देव वर्मा आणि सोमती हे लाकडे घेऊन येत असताना त्यांनी रेल्वे रूळ खचलेले पाहिले.

भूस्ख्लनामुळे जमीन खचली होती आणि त्या ठिकाणचे रेल्वे रूळ वाकडे होऊन मोठी भेग़ पडली होती. जर त्या ठिकाणाहून रेल्वे गेली असती तर रेल्वे रुळांवरून घसरून मोठा अपघात झाला असता आणि हजारो प्रवाशंच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वप्न देव वर्माने आपला शर्ट काढला आणि झेंड्याप्रमाणे हालवून तो येणाऱ्या रेल्वेच्या ड्रायव्हरला इशारे देऊ लागला. त्याची मुलगी त्याच्या बरोबरच होती. शर्टाकडे ड्रायव्हरचे लक्ष जात नाही हे पाहून वर्मा शर्ट फडकवत रेल्वे रुळावरून रेल्वेच्या दिशेने धावू लागला. त्याला पाहिल्यावर ड्रायव्हरने इमरजन्सी ब्रेक दाबून रेल्वे उभी केली. रेल्वे रुळांची अवस्था पाहिल्यानंतर केवढा गंभीर अपघात टऴला आहे याची सर्वांना जाणीव झाली.

त्यांच्या या पराक्रमामुळे त्रिपुरा सरकारने त्या पितापुत्रीचा उचित सन्मान केला. मंत्री सुदीप रॉय बर्मन यांनी स्वप्न देव वर्मा आणि सोमती यांना आपल्या घरी बोलावून त्यांचा खास सत्कार केला. क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही ट्विटवर त्यांचे फोटो शेयर करून त्यांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)