पिढी घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्येच – डॉ. तोडमल

निगडी – विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी उपक्रमशीलता, अभ्यासू वृत्ती, प्रयोगशीलता, सकारात्मकता, नैतिकता, वाचनशीलता, आचरणशुद्धता हे बाळकडू विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. तसेच चौकटी बाहेरचे आनंददायी, उपजीविकेचे, व्यवहार ज्ञानाचे व जीवन जगण्याचे तंत्र शिकवण्याचे व पिढी घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्येच असते, असे प्रतिपादन आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी आकुर्डीतील नवनगर शिक्षण मंडळाचे श्री सरस्वती विद्यालयात महिला दक्षता समिती आयोजित शिक्षक कार्यशाळेत केले.

यावेळी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक – सचिव प्रा. गोविंदरावजी दाभाडे, संचालिका डॉ. अश्विनी दाभाडे, प्राचार्या साधना दातीर, मन:शक्‍ती केंद्राच्या साधक अनुजा चंदने, छाया शिंदे, पर्यवेक्षिका सुरेखा हिरवे व शिक्षक उपस्थित होते.

पालक व शिक्षक अशी दुहेरी भूमिका शिक्षकांची असते. दोषांचे निराकरण करून संस्कार बिजांचे रोपण विद्यार्थ्यांवर केले, तर सामर्थ्यशाली राष्ट्र शिक्षक घडवू शकतात. यासाठी विविध खेळ, गोष्टी, कथा, व्यायाम, अनुभव, युक्‍त्या सांगून सत्कृत्यातून विचार, विचारातून आचरण, आचरणातून व्यक्‍तीमत्व सुधारेल व त्यातून जीवन बदलेल, असे शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले पाहिजे, असे आवाहन डॉ. तोडमल यांनी कार्यशाळेत केले. कार्यशाळेत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कृतीयुक्‍त शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्याचे कार्य शिक्षक करतीलच, अशी अपेक्षा संचालिका डॉ. अश्विनीताई दाभाडे यांनी व्यक्‍त केली व मान्यवरांचे आभार मानले. सुनिता चौधरी यांनी प्रास्ताविक, रेश्‍मा बनसोडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)