पिटीशन रायटार लाचलुचपतच्या जाळ्यात

सातारा, (प्रतिनिधी) – केसचा निकाल पक्षकाराच्या बाजूने लावून देण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच घेताना सातारा जिल्हा न्यायालयातील पिटिशन रायटर दत्तात्रय हरिश्‍चंद्र भांबुरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईने न्यायालयाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. दि 21 ऑगस्ट 2018 रोजी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अतिरिक्त सत्र न्यायालय 4 सातारा येथील परवानाधारक पिटिशन रायटर भांबुरे यांनी पक्षकाराला 313 /12 ची सुनावणी असलेल्या कोर्टची ओळख आहे. कोर्टाला सांगून निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली. त्याचा पहिला हप्ता स्वीकारताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील टायपिंग रूममध्ये स्वीकारताना भांबुरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी त्याला रंगेहाथ पकडले. उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. भांबुरे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)