पिक्‍चर चालला तर त्रुटीही राहणार : नुसरत भरुचा

“प्यार का पंचनामा’ ही सिरीज आणि “सोनू के टिटू की स्वीटी’ नंतर नुसरत भरुचा एकदम फॉर्मात आली. बॉलीवूड करिअरच्या सुरुवातीच्या काळात सिनेमाच्या यशापयशाबाबत खूप चर्चा होते. त्याचबरोबर त्यातील त्रुटींचीही चर्चा होते. पण जर पिक्‍चर चालला तर त्रुटीही राहतील असे नुसरत म्हणते.

“सोनू के टिटू…’नंतर तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोनच बदलून गेला होता. एखादी नवखी कलाकार एवढा चांगला परफॉर्मन्स देऊ शकेल, यावर कोणाचा विश्‍वासच बसत नव्हता. पहिल्यांदा तर लोक सारखे चुकाच काढायचे. मात्र आता चुका दाखवून देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण सिनेमा चांगला होता म्हटल्यावर कलाकाराचा परफॉर्मन्स वाईट होता असे म्हणता येत नाही. प्रसिद्धीच्या बाबतीत लोकांनी स्वीकारल्याची भावना आता नुसरतला जाणवते आहे. पण अजूनही बॉलीवूडमधील स्ट्रगल संपलेला नाही. प्रगती अजून व्हायची आहे. आता समोरचा प्रश्‍न वेगळाच आहे. नवीन सिनेमे खूप मिळत आहेत. पण त्यातील चांगले सिनेमे कोणते, ते निवडायचे कसे आणि त्यात आपला परफॉर्मन्स कसा चांगला असेल, याचा निर्णय करायचा कसा यावर नुसरतला सध्या फार विचार करावा लागतो आहे.

-Ads-

“प्यार का पंचनामा’ सिरीजनंतर तिला चालू मुलीचे अनेक रोल मिळायला सुरुवात झाली होती. मात्र “सोनू,…’नंतर तिला चांगली अॅक्‍ट्रेस समजायला सुरुवात झाली. पहिल्यांदा वर्ष-दीड वर्षात ती एखाद दुसरा सिनेमा करत असे. मात्र आता वर्षात तीन सिनेमेही करू शकेन असा विश्‍वास तिला वाटू लागला आहे. आपल्या कामात चुका नाहीत असा तिचा अजिबात दावा नाही. सुधारणेला अजूनही वाव आहे, हे ती अगदी सहज मान्य करते.

अॅक्‍टिंगचे काम खूप सोपे असेल, असे तिला वाटत होते. पण ते किती कठीण आहे, याचा अनुभव तिला आता आला आहे. पहिल्यांदा ती टीव्ही सिरीयल, जाहिराती, वेबसिरीज आणि सिनेमे या सगळ्यांसाठी ऑडिशन देत हिंडत असायची. त्यातून निवडले जाणे किती कठीण आहे, हे नंतर लक्षात आले. काही वेळा हे अॅक्‍टिंगचे फॅड सोडून घरच्यांचा बिझनेस सांभाळावा असेही तिला वाटले होते. पण “प्यार का पंचनामा’च्या सिक्‍वेलपासून तिची गाडी सुसाट निघाली आहे. सध्या ती “तुर्रम खान’मध्ये राजकुमार रावबरोबर काम करते आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)