पिकविम्यासाठी मुदतवाढीची मागणी

गोंदवले – अपुऱ्या पावसामुळे माण-खटाव तालुक्‍यातील खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. त्यामुळे पिकविम्याचा लाभ दुष्काळी पट्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरू शकतो. शिंगणापूर, मोही, मार्डी, वावरहिरे येथील शेतकऱ्यांना शासनाने पीकविम्याचे पैसे द्यावेत, अशी शेतकरी पीकविमा लाभार्थ्यांकडून मागणी होत आहे. दरम्यान, या पीक विमा भरण्यासाठीची मुदत वाढवून मिळावी, अशी ही मागणी होत आहे.

बहुतेक शेतकरी सहकारी सेवा सोसायटी, राष्ट्रीयकृत, किंवा जिल्हा बॅंका यांच्याकडून अर्थसहाय्य घेऊनच शेती करीत आहे. संबंधित सोसायटी अथवा बॅंका शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करीत असताना सरकारी अधिकृत विमा कंपनीकडून आवर्जून शेतकऱ्यांना विमा उतरवायला लावताहेत. त्याची देय रक्कम शेतकरी लाभार्थींकडून अगोदरच घेतली जाते. मात्र पुढे पावसाअभावी हंगाम आला किंवा वाया गेला हे विमा कंपनी पाहत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतीपिकांचे नैसर्गिक नुकसान झाले वा अन्य बाबींमुळे शेतीपिक नुकसान झाले तरी विमा कंपनी सहसा लाभार्थी शेतकऱ्यांना विमा लाभ देण्यास सरसावत नाहीत, याबाबत सहकारी सेवा सोसायटी अथवा संबंधित बॅंकाही तोंडावर हात ठेवून गप्प राहतात. म्हणजे केवळ पीक विमा कंपनीचा फायदा होताना दिसतो आहे, पीक विमा कंपनीचा फायदा करण्यासाठीच पिकविम्याचे नाटक वाटते.

दुष्काळी पट्यातील वास्तव परिस्थितीची पहाणी करावी खरीप हंगामातील नगदी पिके शेतकऱ्यांच्या हाती लागली आहेत का..? हे प्रत्यक्ष पहावे आणि खरोखरीच शेतकरी तोट्यात असताना पीक विमा कंपनीला त्याची दखल घेण्यास भाग पाडून वाया गेलेल्या खरीप हंगामाची अल्पशी भरपाई करण्याचा प्रयत्न करावा यामध्ये सहकारी सेवा सोसायट्या सर्व बॅंका यांनी विमा कंपनीच्या मागे लागून रब्बी हंगामापूर्वी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात टाकावी अशी मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)