पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ओतूर-नगर -कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूर (ता. जुन्नर) येथील कोळमाथ्यावर हॉटेल मालवणी समोर पिकअप व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 28) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला.
या अपघातात मयूर अंकुश मंडलिक (वय 19, रा. नेतवड माळवाडी, जुन्नर) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती देताना ओतूर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रकाश नेटके म्हणाले की, नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूर बाजूकडून आळेफाटा बाजूकडे जाणारी दुचाकीला (एमएच 14 एफएफ 7789) आळेफाटा बाजूकडून कल्याण बाजूकडे भरधाव वेगात येणारी पिकअप (एमएच 14 जीडी 5938) हीने जोरदार धडक दिली. भरधाव वेगाने पिकअप चालवून ओव्हरटेक करुन दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात मयूर मंडलिक या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअपचा चालक फरार झाला आहे.
ओतूर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची फिर्याद सागर एकनाथ मंडलिक (रा. नेतवड) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात दिली. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक गोसावी करीत आहे.

  • “मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’
    महामार्गावर वाहने सुसाट वेगाने चालविली जात आहेत. अपघातामध्ये काहींना जीव गमवावा लागत आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मनावर नियंत्रण ठेवल्यास आपोआप वाहनाच्या वेगावर ही नियंत्रण राहते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)