पिंप्री कोलंदर येथे विचार मंथन व्याख्यानमालेचे आयोजन

सुपा – पिंप्री कोलंदर (ता. श्रीगोंदे) येथे विचार मंथन आश्रमाच्या वतीने सायंकाळी 7 ते 9 या वेळेत प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब महाराज धोत्रे यांच्या संकल्पनेतून जनजागृतीपर आयोजित केलेल्या विचार मंथन अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला असून, बुधवार, दि. 16 ते मंगळवार, दि. 22 या कालावधीत दररोज काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, नाम-जप यज्ञ, सत्संग, प्रवचन, हरिपाठ, व्याख्यान आणि संगीत भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. 16 रोजी बालरोग तज्ज्ञ डॉ. सतीश आंधळे यांचे “स्त्रीभ्रूणहत्या टाळा आणि बालकांचे संगोपन’ या विषयावर व्याख्यान पार पडले असून, गुरुवार दि. 17 रोजी अहमदनगर जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे या “महिला सबलीकरणावर’ बोलणार आहेत. शुक्रवारी (दि.18) कृषितज्ज्ञ रवींद्र वाघ हे शेती विषयक माहिती सांगणार आहेत. शनिवारी (दि.19) अनंत झांबरे हे प्रात्यक्षिकासह योग व प्राणायामाचे धडे व माहिती देणार आहेत. रविवारी (दि. 20) ऍड. संभाजी बोरुडे यांचे “लोकशाही आणि भारतीय समाजाची मानसिकता’ या विषयावर व्याख्यान होईल. सोमवारी (दि. 21) प्रा. पद्माकर पंडित हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सहसंबंधाबाबत बोलणार आहेत, तर मंगळवारी (दि. 22) शिवव्याख्याते केशव कातोरे हे आपल्या व्याख्यानातून महापुरुषांचे महत्त्व विशद करणार आहेत. बुधवारी (दि. 23) सकाळी 9 ते 11 या वेळेत बाळासाहेब महाराज धोत्रे यांचे काल्याच्या कीर्तनाने व उद्योजक सचिन कातोरे यांच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताह यशस्वीतेसाठी विचार मंथन आश्रमाचे साधक व कोळेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)