पिंपळे सौदागर परिसरात “रेड डॉट’ मोहीम

पिंपरी – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 149 व्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेविका शितलताई नाना काटे, रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रेड डॉट’ या मोहिमेचे आयोजन पिंपळे सौदागर येथील रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी येथे करण्यात आले होते.
या मोहिमेवेळी रेड डॉट स्टीकर चे वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्वागत रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकानी केले. यावेळी नागरिकांना संबोधित करताना नगरसेविका शितल काटे म्हणाल्या की, “रेड डॉट’ मोहीम ही संकल्पना रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातच नव्हे तर ती संपूर्ण चिंचवड मतदार संघामध्ये राबवली जावी. यावेळी मुंबई आयआयटीच्या प्राध्यापिका रजजी अजवाणी यांनी “रेड डॉट’चे फायदे सांगितले. त्या म्हणाल्या की, या मोहिमेमुळे मळलेल्या सॅनेटरी नॅपकीन आणि डायपर, स्वयंपाक घरातील कचऱ्यात मिसळण्यापासून रोखण्यात येऊ शकतील. तसेच वापरल्या जाणाऱ्या सॅनेटरी नॅपकीन, डायपर, कचरा व्यवस्थापन स्वच्छता विषयक टाकाऊ पदार्थाचे व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन व विघटन केल्यास त्यापासून कम्पोस्ट खत निर्मिती करता येईल. स्वच्छता विषयी काम करणा-या कामगारांना “रेड डॉट’ कचरा वर्गीकरण करण्यास मदत होईल. यामुळे त्यांना होणाऱ्या आरोग्य समस्या टाळता येईल. “रेड डॉट’ हा कचरा व स्वछेतेचा कचरा वेगळा करण्यास मदत होईल अशी माहिती त्यांनी उपस्थित महिलांना व नागरिकांना यावेळी दिली. या मोहिमेमध्ये रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील विविध सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी सभासद, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)