पिंपळे सौदागरमध्ये “तिरंगा सन्मान यात्रा’

पिंपरी – भारताच्या 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने “तिरंगा सन्मान यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. यानिमिताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या सन्मान यात्रेत परिसरातील अनेक अबाल-वृद्धांनी सहभाग घेतला. “भारत माता की जय’, “वंदे मातरम्‌’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

याप्रसंगी संरक्षण मंत्रालयाचे खासगी सचिव अरुण ठाकूर, माजी सैनिक राजेंद्र जयस्वाल, अनिल यादव, लालासाहेब शिंदे, रघुवीरसिंग राणा, अशोक चव्हाण, वाल्मिक काटे, उमेश देशपांडे, सुरेश भालेराव, वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी धनाजी माळी, दत्तात्रय शिंदे, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनव भिसे, महिला बचत गटातील रेखा आखाडे यांना सन्मानित करण्यात आले .

-Ads-

उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, पी. के. स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे, दिनेश काटे, सुरेश कुंजीर, सुनील कुंजीर, शंकर चौंधे, उद्योजक राजू भिसे, रामप्रकाश वासनकर, निर्मलचंद उधोजी, रोहिदास गवारे, अतुल पाटील, गणेश भिसे, विवेक तितरमारे, रंजना कुमार, अमित काटे आदी उपस्थित होते.

भारत देशात जन्म घेतलेला प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशाचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी तिरंगा सन्मान यात्रा काढणे गरजेचे आहे त्यामुळेच देशाच्या विविधतेमध्ये एकता अबाधित राहणार आहे. जात, धर्म, पंथ विसरून सर्वांनीच अशा यात्रेत सहभागी होणे काळाची गरज असल्याचे उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

“भारत माता की जय’, “वंदे मातरम्‌’ असा जयघोष करीत ही सन्मान यात्रा कुणाल आयकॉन रस्ता, शिवार चौक, कोकणे चौक, पिंपळे सौदागर गावठाण, स्वराज गार्डन चौक, गोविंद यशदा चौक मार्गे उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ संपन्न झाली. यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. अशी “तिरंगा सन्मान यात्रा’ शहरात प्रथमच झाल्याची भावना अनेक नागरिकांनी बोलून दाखविली. अशा सन्मान यात्रा निघणे गरजेचे असल्याचेही भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. तात्या शिनगारे यांनी सूत्रसंचालन केले. तर जगन्नाथ काटे यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)