पिंपळे गुरव येथे शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा

सांगवी – पिंपळे गुरव येथील दि बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कुल बुधवार (दि. 7 ) हा दिवस विश्‍वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष प्रा अरविंद साळवे, शाळेच्या सचिव मनिषा लाळवे, कोअर कमिटी सदस्य अजित गायकवाड, किरण पैठणे, ऍड प्रवीण गायकवाड सम्यक विद्यार्थी आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष जोगदंड व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी शाळेचे उपाध्यक्ष विकास साळवे यांनी दुहेरी संगमाच्या निमित्ताने आषाढी पोर्णिमेपासून वर्षावासाची सुरूवात तर अश्विन पोर्णिमेला वर्षावासाची समाप्ती व 7 नोव्हेंबर हा दिवस विश्‍वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनाचे महत्व सांगितले. हा दिवस आंबेडकरी अनुयायांच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे याचे विश्‍लेषन केले.
शाळेचे शिक्षक चंद्रकांत कांबळे यांनी “बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन केले, प्रवेश दिनाची सुरूवात शिक्षिका स्नेहल साळवे यांच्या गीताने झाली. प्राचार्य भारत साळवे यांनी प्रास्ताविक केले. आम्रपाली कांबळे यांनी सूत्रसंचलन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद अश्‍विनी साळवे, आम्रपाली निकाळजे, वर्षा खुणे, आशा कांबळे, अश्‍विनी जगताप, जया गायकवाड, सोनाली मैसलगे, पालक शिक्षक समितीच्या अध्यक्षा रूपाली सोनवणे, जयश्री दरेकर यांनी पुढाकार घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)