पिंपळे गुरव येथे पाणी वाचवा जनजागृती अभियान

पिंपळे गुरव (वार्ताहर) – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने राजमाता जिजाऊ गार्डन व पिंपळे गुरव येथे पाणी वाचवा जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत घोषवाक्‍ये, पत्रके, स्लोगन, पटनाटयाद्वारे जनजागृती करण्यात आली.

पाणी वाचवा जीवन वाचवा, आज जल हे तो कल हम हे, सबने मिलकर ठाना, पाणी है बचाना, पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे महत्व तूच जाण, असे संदेश पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आपल्या कपड्यांवर लिहिले होते. स्पीकरद्वारे ही जनतेला पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत होते. पाणी जपून वापरा, पाण्याची गळती थांबवा, गाड्या पाण्याने धुण्याऐवजी ओल्या कपड्याने पुसा असे संदेश दिले.

-Ads-

नागरिकांना आवाहन करताना जोगदंड म्हणाले की, उन्हाळा कडक आहे, सूर्य आग ओकतोय, अशा परिस्थितीत पाणी खूप मौल्यवान आहे, ते जपून वापरा. ऊंट ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पाणी साठवतो व वाळवंटात त्याच पाण्याचा उपयोग करतो. त्याप्रमाणे सर्व नागरिकांनी पाणी वापरण्याचे आवाहन ही अण्णा जोगदंड यांनी केले. यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर ,डॉ. हरिदास अभिषेक, सा.का.हुसेन मुलानी, ताहीर शेख, शहरउपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, ईश्वर सोनोने, संगीता जोगदंड, मराडवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, गजानन धाराशिवकर, हनुमंत पंडित, वनसकर पंडित, जनाबाई ईतापे, राहुल शेंडगे, शिवानंद तालिकोठी, आदिती निकम, ऋतुजा जोगदंड, सचिन नेमाडे, श्रद्धा धुमाळ, व ज्येष्ठ नागरीक ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)