पिंपळे गुरवमध्ये सव्वा लाखांचा गुटखा जप्त

पिंपरी – पिंपळे गुरव येथे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे सव्वा लाखांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (दि. 20) रात्री केली.

छोगराम पेमाराम चौधरी (वय -34, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना एक इसम संशयीतरित्या आढळला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ गुटखा सापडला. यावेळी पोलिसांनी त्याच्या गोडाऊनवरही छापा मारला. त्यात विमल, आर. आम. डी. गोवा असा तब्बल 1 लाख 26 हजार 176 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस हवालदार प्रदीप शेलार, राजन महाडिक, बाळासाहेब सूर्यवंशी, रमेश भिसे, टी. डी. घुगे, राजेंद्र बांबळे, प्रसाद जंगलीवाड, संतोष दिघे, प्रदीप गुट्टे, पांडुरंग फुंदे, अशोक गारगुटे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)