पिंपळी-लिमटेकच्या सरपंचपदी नितीन देवकाते

डोलेॅवाडी -पिंपळी-लिमटेक (ता. बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नितीन रामचंद्र देवकाते यांची निवड झाली. पिंपळी-लिमिटेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने संजीवनी यादव यांनी राजनामा दिला होता. त्यामुळे या ग्रामपंचायतचे सरपंच पद रिक्त झाले होते. सोमवारी (दि. 28) निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड एस. एस. यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यात सरपंच पदासाठी छत्रपतीचे कारखान्याचे मा.संचालक हरिश्‍चंद्र देवकाते यांच्या गटातील नितीन रामचंद्र देवकाते आणि छत्रपतीचे विद्यमान संचालक संतोष ढवाण यांच्या गटातील अलका भोसले यांनी अर्ज दाखल केले होते. यात नितीन देवकाते यांना 8 तर, अलका भोसले यांना 5 मते मिळाली. यात नितीन देवकाते यांना 8 मते मिळाल्याने निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी त्यांना विजयी घोषित केले. विजयी घोषित होताच पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायती समोर देवकाते गटातील कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाकड्याची आतिषबाजी करत जल्लोष केला. यावेळी हरिशचंद्र देवकाते, तंटामुक्ती अध्यक्ष आणि सोसायटीचे चेअरमन रमेश देवकाते, अशोक देवकाते, आबासो देवकाते, उत्तम मदने, सोमनाथ यादव, राजू चौधरी, शिवाजी देवकाते, बाळासो देवकाते, काशिनाथ ऊर्फ सोनूभाऊ देवकाते, हरिभाऊ केसकर, हरिभाऊ देवकाते, दादा केसकर, नामदेव मेरगळ , मोहन बनकर, नारायण देवकाते व पिंपळी-लिमटेकचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)