पिंपळसुटीत युवतीची आत्महत्या

शिरूर – पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रियंका चंद्रकांत पोखरकर (वय 18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. शुक्रवारी (दि.19) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा प्रकार घरातील लोकांच्या निदर्शनास आला.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियंका ही शिरूर येथील उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 12वी वाणिज्य वर्गात शिकत होती. मार्च महिन्यात तिने परीक्षा दिली होती.गुरुवारी(दि.18) जेवन करुन नेहमीप्रमाने सर्व कुटुंबिय झोपले होते. शुक्रवारी पहाटे जिवाजी पोखरकर हे उठल्यानंतर किचन रुममध्ये प्रियंका हिने पंखा अडकविण्याच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी राजेश फकिरा आदक यांनी मांडवगण फराटा पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, हवालदार आबासाहेब जगदाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)