पिंपळगाव येथे कला क्रीडा महोत्सव उत्साहात

यवत- पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवांतर्गत पिंपळगाव (ता.दौंड) येथे झालेल्या संपूर्ण दौंड तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांच्या स्पर्धांत दौंड तालुक्‍यातील डाळींब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने भजन स्पर्धा (मोठा गट) आणि लेझीम स्पर्धा (मुली) या सांघिक प्रकारात संपूर्ण दौंड तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावून एक इतिहास घडवला. विजेत्या संघाला पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश नवले, गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ हिंगणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
या यशाबद्दल कासुर्डी केंद्राचे प्रमुख शंकर त्रिगुणे, सतीश म्हस्के, डाळींबच्या सरपंच वनिता धीवार, अनिल धीवार, तानाजी कुंजीर, योगेश म्हस्के, देवीदास म्हस्के, अजिंक्‍य कांबळे, तानाजी म्हस्के, अंकुश झिंजुरके, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकांनी स्पर्धक मुलांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापिका चंद्रकला मालुंजकर, रवींद्र जाधव, अनिता भोसले, शालीनी पवार, मीना कुंजीर, दीपक कदम, आशा म्हस्के या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)