पिंपळगाव माळवी तलावातून 13 विद्युतपंप जप्त

नगर: पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील महापालिकेच्या तलावातून अवैधरीत्या पाणीउपसा करणाऱ्या विद्युतपंपावर महापालिका, पोलीस व महसूल प्रशासनाच्या पथकाने आज सकाळी कारवाई केली. सुमारे 13 विद्युतपंप महापालिकेने जप्त केले आहेत. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांची त्रेधा उडाली होती. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे संबंधितांवर पुढील कारवाईसाठीचा अहवाल सादर केल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख महादेव काकडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील धरण व तलाव पाणीसाठे आरक्षित केले आहेत. शेतीसाठी किंवा बांधकामासाठी धरण किंवा तलावातील पाणीसाठ्याचा वापर किंवा उपसा करता येणार, असे आदेश आहेत. स्थानिक महसूल कार्यालयांना अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश आहे. महसूल, पोलीस अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक त्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. असे आदेश असतानाच महापालिकेच्या पिंपळगाव माळवी तलावातून स्थानिक शेतकरी विद्युतपंप लावून पाणीउपसा करत असल्याचे समोर आले आहे. विद्युतपंप लावून तलावातून पाणीउपसा शेतीसाठी सुरू होता. या स्थानिक शेतकऱ्यांना वारंवार सूचना देखील देखील तलावातून पाणीउपसा करत होते.

महापालिका, महसूल, पोलीस, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज एकत्र येत पथकाची स्थापना केली. पिंपळगाव माळवी तलावात सोडलेल्या विद्युत पंपावर कारवाई केली. 13 विद्युतपंप, प्लास्टिकचे पाईप, वीज वाहक तारा, असा मोठा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)