पिंपळगाव जोगे धरणाच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

तीन-चार दिवसांत परवानगी देण्याची मागणी

बेल्हे- पिंपळगाव जोगे धरणाच्या डाव्या कालव्याला एक महिण्यापासून पाणी आवर्तन सुरू आहेत. तरीही अद्याप बेल्हे, राजुरी, उंचखडक गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, राजुरी गावचे सरपंच संजय गवळी, उंचखडक गावचे सरपंच दत्तात्रय कणसे, चंद्रकांत जाधव, माऊली शेळके, बाळासाहेब औटी यांनी कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. बेल्हेकर व फरीद इनामदार यांना निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली आहे. तीन-चार दिवसांत पाणी न उचलू दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्नर तालुक्‍यात वडज, माणिकडोह, चिल्हेवाडी, येडगाव, पिंपळगाव जोगे ही पाच धरणे आहेत. जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागाला व पारनेर तालुक्‍याला वरदान ठरलेले पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्यात 25 ऑक्‍टोबर रोजी पाणी सोडले आहे. जवळपास एक महिण्यापासून या कालव्यात पाणी सोडण्यात आले असून पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी राजुरी व उंचखडक या गावातील शेतकऱ्यांना अद्याप पाणी उचलू दिलेले नाही.
यामुळे राजुरी व उंचखडक या दोन ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, परिसरात यावर्षी अतिशय कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे. ऐन पावसाळ्यात विहीरी व बोअरवेल आटलेले आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांचा चारा सुकू लागला आहे. तरी या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाणी उचलून द्यावे.
दरम्यान गेल्या एक महिण्यापासून या कालव्याला पाणी सुरू असून ही तालुक्‍याच्या पूर्व भागातील राजुरी, बेल्हा, उंचखडक या गावातील शेतकऱ्यांना पाणी घेता येत नाही. येथील शेतकऱ्यांनी कालव्यावर मोटारी पाणी उचलण्यासाठी टाकल्या होत्या त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. तरी गावातील शेतकऱ्यांना पाणी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)