नीरा- पिंपेरे (ता. पुरंदर) येथील विवाहिता पूजा गायकवाडने केलेली आत्महत्या ही आत्महत्या नसून तिचा खून करण्यात आला असल्याचा आरोप तिचे वडील पोपट भोसले यांनी केला आहे. तसेच त्यांनी त्या दृष्टीने तपास करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ही जेजुरी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, शवविछेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरे गावाच्या हद्दीत पूजा गायकवाड या विवाहितेचा दोन दिवसांपूर्वी रेल्वे मार्गानजीक मृतदेह आढळून आला होता. तर पूजा यांचा नवरा, सासरा, सासू यांच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केली असून तिच्या अंत्यविधीनंतर घडलेल्या घटनेची व परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याची खात्री पोपट भोसले यांना झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. भोसले यांनी पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा उदय गायकवाड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी 307 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. विवाहानंतर माझ्या मुलीचा त्याने छळ केला. तरीही आम्ही अनेक वेळा समेट घडवून मुलीला सासरी पाठविले. दोन महिन्यांपूर्वीच ती सासरी गेली होती. या घटनेच्या आदल्या रात्री घरात भांडण झाल्याची माहिती तिने दिली होती. दुसऱ्या दिवशी तिला घेवून जाणार होतो. मात्र, त्यापूर्वीच तिला घरातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सासरच्या लोकांनी तिची हत्या केल्याचा संशय आहे. त्याचबरोबर जर रेल्वेला धडकून किंवा रेल्वे खाली सापडून मृत्यू झाला असता तर एकाच ठिकाणी जखमा कशी?, तिच्या हातावर भाजल्याच्या जखमा कशा आल्या? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर शवविच्छेदन करताना तिच्या मृत्यूची वेळ तपासावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

  • मुलीच्या वडिलांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होईल. यामध्ये गुन्हेगार कोणीही व कितीही मोठा असला तरी हयगय केली जाणार नाही.
    अंकुश माने, पोलीस उपनिरीक्षक जेजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)