पिंपरे बुद्रुकमधील कबड्डी स्पर्धेत पाडेगाव संघाला विजेतेपद

लोणंद- नेहरू युवा केंद्र सातारा व नेहरू युवा मंडळ पिंपरे बुद्रुक यांच्यावतीने तालुका कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पाडेगाव संघाने विजेतेपद पटकावले.

पिंपरे बुद्रुक येथे आयोजित केलेल्या या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत संभाजी घाडगे, तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विजयकुमार घाडगे, शिक्षक सूर्यकांत रासकर, मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खंडाळा तालुका उपाध्यक्ष उत्तमराव शिंदे, उपाध्यक्ष देवीदास चव्हाण, सचिव विठ्ठल भिसे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

 

स्पर्धेत पाडेगाव येथील संघाने विजेतेपद पटकावले तर द्वितीय क्रमांक खेड बुद्रुकच्या संघाने मिळवला. पिंपरे बुद्रुकचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. बक्षीस वितरण समारंभात राहूल घाडगे, धनंजय धायगुडे, सुरज खताळ, संदीप काकडे, गणेश धायगुडे, माऊली काकडे, अनिकेत साळुंखे, श्रीधर सोनवलकर, अविनाश धायगुडे, युवराज शिंदे, अभिजीत कराडे, नवनाथ अहिरेकर, पृथ्वीराज धायगुडे उपस्थित होते. प्रास्ताविक विशाल शिंदे यांनी केले तर देवीदास चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)