वाघोली- पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील कचरा प्रकल्प रद्द व्हावा म्हणून विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी – पुणे, महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका महापौर यांची शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नेत्वृवाखालील शिष्टमंडाळाने आज (दि. 21) भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष रोहिदासशेठ उंद्रे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दादासाहेब सातव, पुणे जिल्हा भाजपचे संपर्क प्रमुख ऍड. धर्मेंद्र खांडरे, पिंपरी सांडस ग्रामपंचायत सरपंच राजू भोरडे, पुणे जिल्हा भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्‍याम गावड, उरळी कांचनचे माजी उपसरपंच सुनील कांचन, पुणे जिल्हा भाजप युवा नेते अजिंक्‍य कांचन, पुणे बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण, पिंपरी सांडस उपसरपंच अनिल काळे यांसह विविध मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. लवकरच मुख्यमंत्र्यांची आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन कचरा प्रकल्प रद्द करण्याबाबत मागणी करणार असल्याचे यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)