पिंपरी विधानसभेसाठी मतदार नोंदणी अभियान

पिंपरी – लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी विधानसभा मतदार संघात महापालिकेच्या वतीने मतदार यादी संदर्भात 14 व 28 जुलै या दोन दिवशी विशेष मतदान नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्‍त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.

या मोहिमेत दोन्ही दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहणार असून यावेळी मतदारांना त्यांचे नाव नोंदवता येणार असून या कालावधीत त्यांचे कागदपत्रे व अर्ज स्विकारले जाणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर 1 सप्टेंबर 2018 पर्यंत मतदार यादीचे प्रारुप जाहीर केली जाणार आहे. यामध्ये ज्या मतदारांचे छायाचित्र कृष्णधवल आहेत, ज्यांचे छायाचित्र उपलब्ध नाहीत, काहींची दुबार आहेत, जे मतदार मयत आहेत किंवा ज्यांचे स्थलांतर झाले आहे. त्यांची नावे यावेळी मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा करणार आहेत.

यावेळी मृत मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी नमुना 7 चा अर्ज भरला नसेल तर अशी नावेही यावेळी वगळण्यात येणार आहेत. तर कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे पंचनामे करुन वगळण्यात येणार आहेत. तसेच ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाही त्यांनी त्यांचे रंगीत पासपोर्ट साईज फोटो, छायांकीत आधार कार्डची प्रत व पॅनकार्डची प्रत सोबत देऊन नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)