पिंपरी रेल्वे स्थानकासाठी सरकता जीना

काम प्रगती पथावर : प्रवाशांसाठी सुविधा

पिंपरी – प्रवाशांचा प्रवास गतीमान आणि सुरक्षित होण्यासाठी रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, रेल्वे स्थानकावरील असुविधेमुळे अनेक प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोचायला जीना चढून जावे लागते. त्यामुळे 70 टक्‍के प्रवासी रुळ ओलांडून दुसऱ्या बाजूला जातात आणि त्या प्रयत्नात अनेक प्रवाशांना आत्तापर्यंत जीव गमवावा लागला आहे. यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी आता पिंपरी रेल्वे स्थानकावर सरकता जीना बनवण्यात येणार आहे. त्याचे काम प्रगती पथावर आहे.

-Ads-

पिंपरी स्थानकावर एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सरकता जीना नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची गैरसोय होत होती. मात्र, आता सरकता जीन बसवण्यात येणार असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी या जीन्याचा वापर होणार आहे. पिंपरी स्थानकाच्या एका बाजूला भाजी मार्केट आहे व दुसऱ्या बाजूला पुणे-मुंबई जुना महामार्ग आहे. केवळ दोन रुळ ओलांडले की दोन मिनिटात इच्छीत स्थळी पोचू शकतो, अशी स्थिती आहे.

पिंपरी रेल्वे स्थानकात दोन पादचारी पुल आहेत. मात्र त्याचा उपयोग नाममात्रच आहे. काही प्रवासी तर आपल्या लहान मुलांना हाताला धरुन व दुसऱ्या हातात अवजड सामान घेऊन रुळ पार करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सरकता जीना बनवण्याचे काम हाती घेतले आहे.

रेल्वे प्रवासी नियम व अटी यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून स्वत:चा जीव धोक्‍यात घालतात. अशा प्रवाशांना अनेकदा दंडसुद्धा आकारला जातो. मात्र, लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्टेशनवर आता सरकता जीना होत आहे. याचा आनंद आहे. त्याचा फायदा नक्कीच प्रवासी घेतील व ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळेल.
                                                  – एक रेल्वे प्रवासी, पिंपरी.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)