पिंपरी रेल्वे स्थानकावर फुकटे झाले उदंड

पिंपरी – पिंपरी रेल्वे स्थानकावरुन अनेक नोकरदार व विद्यार्थी रोज प्रवास करतात. यामुळे येथे मोठी गर्दी बघायला मिळते. मात्र याच गर्दीचा फायदा घेऊन काही फुकटे प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पिंपरी रेल्वे स्थानकावर तीन तिकीट खिडक्‍या असून त्यातील एक खिडकी बंद असल्याने रांगेत थांबवण्याऐवजी विना तिकीट प्रवासाला प्रवासी प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

सिंहगड आणि सह्याद्री एक्‍सप्रेस अनुक्रमे सकाळी 6:31 व 7:38 ला येतात. त्यासाठी स्पेशल एक खिडकी उघडली जाते. तसेच खिडकी वरील तिकीटांचा ताण कमी व्हावा म्हणून तीन एटीव्हीएम मशीन रेल्वे स्थानकावर बसवल्या आहेत. मात्र त्या मशीन बहुतांश प्रवाशांना वापरताच येत नसल्याने त्यांचा फारसा वापर होत नाही. त्यामुळे तिकीट खिडकीवर ताण येत आहे. पिंपरी रेल्वे स्थानकावरुन सुमारे तीन हजार प्रवास तिकीट काढून प्रवास करतात. त्यात एक्‍सप्रेसचे प्रवासी जवळपास पंधराशे प्रवासी मुंबई, कुर्डवाडी अशा दूरच्या प्रवासाला जातात. लोणावळा ते पुणे, पुणे ते लोहगाव या मार्गावर एकूण 42 लोकल आहेत. मात्र त्यापैकी 4 लोकल ब्लॉक मुळे रद्द केल्यात आल्याने 38 लोकल धावत आहेत. सकाळी 8:30 व 9:30 ला जाणाऱ्या लोकलसाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांची एकच झुंबड होते. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना विनातिकीट प्रवास करावा लागतो. तर काही नेहमीचेच फुकट प्रवास करत आहेत. त्यामुळे रेल्वे विभागाचे मोठे नुकसान होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी रेल्वे स्थानकावर टी. सी. नसल्याने फुकट्या प्रवाशांना भिती राहिली नसून ते खुलेआम रेल्वे स्थानकावर वावरतात. सकाळची वेळ वगळता दिवसभर एकच तिकीट खिडकी चालू असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. तीन एटीव्हीएम मशीन पैकी दोन मशीन चालू असून एक मशीन बंद आहे. तसेच मशिनचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यल्प आहे. एटीव्हीएम मशीन प्रवाशांना वापरता येत नसल्याने त्या ठिकाणी निवृत्त रेल्वे कर्मचारी प्रवाशांना तिकीट काढून देत आहेत. यावर त्यांना कमिशन मिळत असल्याची चर्चा आहे. रेल्वे स्थानकावर कायमस्वरुपी एक तिकीट तपासणीस असावा, त्यामुळे फुकट्या प्रवाशांनवर वचक राहील, असे मत रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)