पिंपरी रेल्वे स्थानकाची लांबी वाढणार!

पिंपरी – पिंपरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म लहान असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्याला वाढवण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकालगत असलेली भाजी मंडईतील अनधिकृत दुकाने हटवण्यास लोहमार्ग पोलीस व “आरपीएफ’ जवानांच्या फौज फाट्यासह सुरूवात केली आहे. पिंपरी रेल्वे स्थानका लगत असलेल्या पिंपरी भाजी मार्केट येथील 55 फळ-भाजी विक्रेत्यांचे अनधिकृत दुकानांना नोटिसा दिल्या आहेत.

पिंपरी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षा भिंतीला चिकटून असल्याने त्यांना रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावल्या आहे. रेल्वे प्रशासनाने सोमवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पिंपरी रेल्वे स्थानकाची लांबी कमी असल्याने स्थानकावर आलेल्या रेल्वे गाडीचे 3त्तिे 4 डब्बे प्लॅटफॉर्मच्या बाहेर जात असल्याने प्रवाशांना गाडीत बसतांना व उतरतांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, तर बऱ्याच वेळा प्रवाशांचा येथे अपघात झाले होते. अपघात आणि प्रवाशांच्या समस्या टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे ते लोणावळा जाणाऱ्या दिशेला 153 मिटर प्लॅटफॉर्म भाजी मंडई लगत वाढवण्यात येणार आहे. तर लोणावळा ते पुणे जाणाऱ्या दिशेला 121 मिटर तर तोच प्लॅटफॉर्म पुणे ते लोणावळा या दिशेला वाढवण्यात 35 मिटर वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूच्या अतिक्रमण केलेल्या दुकानांना व घरांना पिंपरी-चिंचवड महापालिका व रेल्वे प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून हे काम दिवाळीच्या नंतर जोराने सुरु करण्यात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)