पिंपरी रेल्वे स्थानकाचा सरकता जीना अंतिम टप्यात

  • प्रवाशांची सुविधा : सुमारे 90 लाख रुपयांचा खर्च

पिंपरी – पिंपरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ये-जा करंयासाठी उभारला जाणारा सरकता जीना लवकरच वापरासाठी खुला होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पिंपरी रेल्वे स्थानकावर गेल्या चार महिन्यापासून सुरु असलेल्या सरकत्या जीन्याचे कामकाज जवळपास पूर्ण झाले आहे. स्थानकावर रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. आत्तापर्यत प्रवाशांना प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी पायऱ्याच्या जीन्याचा वापर करावा लागत होता. त्यामुळे अनेक वृद्धांना, दिव्यांगा, तसेच आजारी प्रवाशांना त्रास होत होता. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशी रेल्वे रुळावरुन प्लॅटफॉर्म बदलत होते. यामुळे अपघाताच्या घटना घडत होत्या. यामुळेच येथे सरकाता जीना बसवण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सरकत्या जीन्याचा फायदा अनेक वृद्ध, आजारी, दिव्यांग नागरिकांना होणार आहे. पिंपरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चढण्यासाठी दोन सरकत्या जीन्याचे रेल्वे प्रशासनाकडून निर्माण केले गेले आहे. तर पुणे रेल्वे विभागात पुणे स्टेशन , पिंपरी, व कोल्हापुर अशा एकूण 8 सरकत्या जीन्याचे कामकाज पुर्ण झाले आहे. काहीच दिवसात हे जीने वापरासाठी खुले होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी एका जीन्याच्या निर्मितीसाठी 90 लाख रुपये खर्च केले आहेत. तर एकूण 8 सरकत्या जीन्यावर सुमारे 7 कोटी खर्च केला आहे. आता प्रवाशांना ये-जा करण्यासाठी अत्यंत आरामदायी असलेला जीना कधी सुरु होतो याची प्रवाशांना आस लागली आहे.

पिंपरी रेल्वे स्थानकावरुन सुमारे दहा हजार प्रवाशी रोज प्रवास करतात. सरकत्या जीन्यामुळे निश्‍चितच रुळावरुन ये-जा करणाऱ्यांची संख्या कमी होईल व अपघात टळतील तसेच वृद्ध, दिव्यांग, आजारी प्रवाशांना हा जीना अत्यंत उपयोगी असेल.

– नरेंद्र ढवळे, स्टेशन मास्टर, पिंपरी रेल्वे स्थानक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)