पिंपरी येथे मंगळसूत्र हिसकावले

 

पिंपरी– दुचाकीवरील चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र रविवार दि. 30 ला रात्री साडेआठच्या सुमारास पिंपरी येथे उज्जीवन फायनान्सच्या ऑफिस समोर हिसकावले. विद्या अरुण शिनकर (वय 38, रा. वैभवनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विद्या आणि त्यांची जाऊ जेवण करण्यासाठी जात होत्या. सव्वा चार तोळे वजनाच्या मंगळसूत्राची किंमत 1 लाख 27 हजार 500 रुपये आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)