पिंपरी बुद्रुक येथे दिंडी सोहळ्याचे स्वागत

नीरा नरसिंगपूर- पिंपळवाडी व दुर्गाव (ता. कर्जत) येथील श्रीक्षेत्र दत्त देवस्थान येथून कार्तिक वारीसाठी पंढरपुकडे निघालेल्या पायी वारीचे पिंपरी (ता. इंदापूर) येथे नुकतेच स्वागत करण्यात आले. तसेच पालखीतील सहभागी भाविकांना चहा-नाश्‍तांची ग्रामस्थांनी सोय केली होती. पालखीचे प्रमुख विश्‍वस्त गोपाळ महाराज शर्मा म्हणाले की, परंपरेनुसार हा दिंडी व पालखी सोहळा पंढरीकडे निघाला असून दिंडीतील भाविकांना विठू भेटीची ओढ लागली आहे. तसेच पालखी मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणीवरील ग्रामस्थ अमचा यथोचित असता आदरातिथ्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. पालखी व प्रमुख दिंडी चालक गोपाळ शर्मा महाराज व योगिता शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व विणेकरी-मृदंगवादक टाळकरी दिंडी व पालखीचा सोहळा घेऊन चोपदार लक्ष्मण जंजिरे, मृदंगवादक सौरभ किसन गवळी व सर्व भाविकांचा या दिंडीत सहभाग आहे. दरम्यान, पिंपरी बुद्रुक येथे नामदेव बोडके, बाळासाहेब घाडगे, महेश सुतार, महादेव सुतार, सोमनाथ चौगुले, बाळासाहेब मगर, भारत बोडकेयांनी पालखीचे स्वागत करून भाविकांच्या चहा-नश्‍त्याची सोय केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)