पिंपरी बुद्रुक मार्गावर ऊस वाहतूक जीवघेणी

ट्रॅक्‍टरचे हेलखावे जीवावर बेतणार

नीरा नरसिंहपूर- इंदापूर तालुक्‍यातील पिंपरी बुद्रुक ते गोंदी रस्त्यावर ऊस वाहतूक नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे ऊस वाहतूकदार या मार्गावर वाहतूक “नको रे बाबा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. याच मार्गावर विद्यार्थी शाळेत जात आहेत. त्यामुळे या मार्गाचे खडीकरण करण्याची मागणी होत आहे.
पिंपरी बुद्रुक येथून राज्य मार्गालगत जोडणारा अंतर्गत रस्ता आहे. प्रत्येकवर्षी ऊस वाहतूक ट्रॅक्‍टर चालक याठिकाणी ऊस तोडणी व वाहतूक करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. या मार्गावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. ऊस वाहतूक करण्यास त्रास सहन करावा लागतो आहे. खड्डयांतून ऊस वाहतूक करावी लागत आहे. बऱ्याचवेळा मोठ्या खड्डयांत ट्रॅक्‍टर रूतत आहे. काहीवेळा ट्रॅक्‍टर हेलकावे खात जात असल्यामुळे शेजारच्या वाहनांवर पडण्याची भीती आहे. या मार्गावर ट्रॅक्‍टर उलटण्याच्या घटना घडत आहेत. शेतकरी आणि शेतमजुरांना यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतीला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे. पिंपरी बुद्रुक परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी याच मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)