पिंपरी बुद्रुक गणात अंचारसंहिता लागू

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यातील पिंपरी बुद्रुक पंचायत समिती गणाची पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून या गणात अंचारसंहिता लागु झाल्याची, माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील जोशी यांनी दिली.
खेड तालुक्‍यात पंचायत समितीच्या निवडणूका फेब्रुवारी 2016 मध्ये झाल्या होत्या. पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित होते. तालुक्‍यातील 14 पंचायत समिती जागांपैकी रेटवडी गण (45), व पिपंरी बुद्रुक गण (51) अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाला होता. या दोन गणात त्यावेळी मोठी चुरस होती. सभापती कोण होणार याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले होते. रेटवडी गणातून शिवसेनवच्या सुभद्रा शिंदे तर पिंपरी बुद्रुक गणातून भाजपच्या धोंडबाई खंडागळे निवडून आल्या होत्या.
सभापतीचा दावेदार म्हणून भाजपाने या गटातून अंगणवाडी कार्यकर्ती धोडांबाई साहेबराव खंडागळे यांना उमेदवारी देऊन निवडून आणले होते. सात टपाली मतदानासह एकुण 5482 मते मिळवत निवडून आल्या मात्र, नियमानुसार एकाच पदावर रहाता येत असल्याने धोडांबाई खंडागळे यांनी आपली रोजरोटी असणारी अंगणवाडी कार्यकर्तीचा राजीनामा देण्याऐवजी पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा तीन महिन्यांपूर्वी दिला होता. निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिक्‍त जागांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याने खेड तालुक्‍यातील पिंपरी बुद्रुक गणाची पोटनिवडणूक ऐन पावसाळ्यात लागल्याने पक्षीय राजकारणाचा पूर वाहणार आहे. पिपंरी बुद्रुक पंचायत समिती गणात एकुण 22 मतदान केंद्र आहेत. 8722 महिला, 10004 पुरुष असे एकुण 18726 मतदार आहेत. नुकत्याच गेल्या 21 फेब्रुवारीला झालेल्या पंचायत समितीच्या या गणात टपाली 11 मिळुन 13312 मतदान झाले होते तर 213 मतदारांनी नोटाचा वापर केला होता. या गणात तळवडे, कोहिंडे बुद्रुक किवळे, कुरकुंडी, कोये, धामणे, आसखेड बुद्रुक कोरेगाव बुद्रुक, कोरेगाव खुर्द, चांदुस, पिपंरी बुद्रुक, संतोषनगर, बिरदवडी, गोनवडी, रोहकल, पिपंरी खुर्द ही गावे येतात या गावांना अंचारसंहिता लागु झाली आहे.

  • पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम
    सोमवार (दि. 31 जुलै) ते शनिवार (दि. 5 ऑगस्ट) या काळात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी नामनिर्देशन स्वीकारणे. 7 ऑगस्टला उमेदवारी अर्ज छाननी, तर उमेदवारी माघार सोमवार (दि. 14 ऑगस्ट) सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे. मतदान रविवारी (दि.14 ऑगस्ट) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी आणि निकाल सोमवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)