पिंपरी बुद्रुकला मंगळवारपासून ऊरूस

नीरा नरसिंहपूर-पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील सर्वधर्म समभावाचे प्रतिक ग्रामदैवत पिरसाहेब (उदगीरबाबा) यांचा सालाबादप्रमाणे ऊरुस मंगळवार, दि. 26 ते 28 मार्च दरम्यान होणार आहे. पिरसाहेब ऊरुस कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जय्यत तयारी चालू आहे.

पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीचे ग्रामदैवत पिरसाहेब (उदगीरबाबा) यांचा सालाबादप्रमाणे संदल मंगळवारी सायंकाळी 9 वाजता मजारवर चढवण्यात येणार आहे. तर बुधवारी मुख्य उरुस भरणार असून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील भाविकांची नवस फेडण्यासाठी व दर्शनास मोठी गर्दी होत असते. त्याच दिवशी मेवा मिठाई, खेळणी, बांगडी, सौंदर्य प्रसाधने, आईस्क्रीम, ज्युस आदि विक्रीची मोठी दुकानांची गर्दी होत असते. सायंकाळी देवाच्या मानाच्या घोड्यांची मिरवणूक (छबीना) सायंकाळी 7 वाजता फटाक्‍यांच्या आतषबाजीत लेझीम हलगींच्या निनादात काढण्यात येणार आहे.

रात्री 9 वाजता सागर शिंदेसह प्रियंका शिंदे लोकनाट्य तमाशा मंडळ मांडवेकर यांचा प्रसिद्ध तमाशा होणार आहे. गुरूवारी सायंकाळी 4 वाजता पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील मल्लांच्या उपस्थित कुस्त्यांचा जंगी मुकाबला होणार आहे. सायंकाळी प्रार्थना करुन ऊरुसाची सांगता करण्यात येणार आहे.

  •  लाईट, पाणी द्या
    पिरसाहेबांच्या दर्गाहच्या सभोवताली भाविकांना प्रदक्षिणा घालण्यापूर्वी हात पाय धुण्यासाठी असलेला हातपंपाला कठडा करून तो दुरूस्त करावा ज्यामुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी मर्क्‍युरी लावण्यात आले नसून लावण्याची मागणी भाविकांनी ऊरुस कमिटीकडे केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)