पिंपरी बुद्रुकमध्ये भारुडाद्वारे समाजप्रबोधन

नीरा नरसिंहपूर – जोहार मायबाप जोहार तसेच आईचा जोगवा जोगवा मागेन अशा पद्धतीच्या भारूडाच्या ओव्यातून समाजाचे प्रबोधन भारूडकार भगवान पवार (महुद) यांनी केले. पिंपरी बुद्रुक (इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात संत दानाअप्पा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भारूड घेण्यात आले. यावेळी भगवान पवार महाराज व भारूडकार शंकर बडे महाराज (कोंडभावी) यांचा लोकप्रबोधनात्मक भारूडाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तबलासाथ रामचंद्र शेळके महाराज, हार्मोनीयमसाथ नाना काशिद, विणेकरी सोमनाथ चौगुले, शहाजी पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते. संत दानाअप्पा महाराज यांची पालखीला ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली. काल्याचे कीर्तन दत्तात्रेय शेळके महाराज यांचे होवून उपस्थित ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटपाने सांगता करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)