पिंपरी बाजारपेठेत एक दिवसीय बंद

– सिंधी समाज बांधवांनी जे. पी. आसवानी यांना श्रध्दांजली

पिंपरी – मानवता, शांतता आणि शाकाहाराचे पुरस्कर्ते, आध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनामुळे व्यथित झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील सिंधी समाज बांधवांनी पिंपरी बाजारपेठ बंद ठेवत श्रध्दांजली अर्पण केली.

आध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांचे काल निधन झाले. आज (शुक्रवारी) पुण्यात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना आदरांजली म्हणून दादा वासवानी यांना सिंधी समाजाचे आधारस्तंभ मानले जात होते. त्यांच्या निधनामुळे मायेचे छत्र हरपल्याची भावना पिंपरी-चिंचवड शहरातील सिंधी बांधवांमध्ये आहे. त्यांच्या निधनामुळे समाज बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यामुळे आज पिंपरी बाजारपेठ बंद ठेवत त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

कपडे, किराणा भुसार, ज्वेलरी, मोबाईल शॉप, इलेक्‍ट्रॉनिक दुकाने, मिठाईवाले तसेच किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने दिवसभर बंद होती. भाजी मंडई व फुलबाजार वगळता संपुर्ण बाजारपेठेत भयाण शांत पसरली होती. पिंपरी कॅम्पमध्ये चौका-चौकांमध्ये दादा श्‍याम, वुई लव यु फोरएव्हर असे फ्लेक्‍स झळकत होते. मात्र, ग्राहकांना बाजारपेठ बंद असल्याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने त्यांना विनाखरेदी परतावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)