पिंपरी पोलीस आयुक्‍तालयासाठी 43 उपनिरीक्षकांच्या नियुक्‍त्या

 आयुक्‍तालयांतर्गत 181 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
पिंपरी – नव्याने महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांपैकी 43 पोलीस उपनिरीक्षकांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत पोलीस उप निरीक्षकांच्या राज्यातील विविध आयुक्तालयात नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत.

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने नियुक्त झालेले पोलीस उप निरीक्षकांमध्ये गोविंद लक्ष्मण चव्हाण, किरण सदाशिव कणसे, संदीप शांताराम गांधीलकर, महेंद्र बाळासाहेब गांधले, गणेश नारायण गायकवाड, अमरदीप कृष्णा पुजारी, गणेश नारायण आटवे, मैनीनाथ ज्ञानेश्‍वर वरुडे, अनिरुद्ध महादेव सरवदे, अशोक भागवत तरंगे, चंद्रकांत गंगाधर जवळगी, शंभू गोरक्षणनाथ रनावरे, राजेश भारत मोरे, रविंद्र सुखदेव मुंडल, रुपेश अशोक साबळे, यशवंत ज्ञानेश्‍वर साळुंखे, मकसूद किरण मणेर, इम्रान बाबाजी मुल्ला, प्रितेश शामराव पाटील, सचिन पंडीत देशमुख, संतोष सुग्रीव डोलारे, अशोक बाळू जगताप, सागर बबन बामणे, अमोल रमेश डेरे, रोहीत राजेंद्र दिवटे, सोमनाथ सुरेश झेंडे, अमोल श्रीरंग कामठे, अशोक नानाभाऊ कोकाटे, नामदेव रंगराव अंगज, संदेश संभाजी इंगळे, ज्ञानेश्‍वर यल्लू धनगर, जितेंद्र सुरेश गिरनार, विवेक विनायक कुमठकर, गोविंद युवराज पवार, सचिन अरुण चव्हाण, संतोष हरिभाऊ येदे, ज्ञानेश्‍वर काशिनाथ दळवी, संतोष सर्जेराव गांधले, भाऊ पोपट दुबे, दस्तगीर हसन तांबोळी, दत्तात्रय जयसिंग नागरगोजे, ज्ञानेश्‍वर सुभाष कोकाटे, उत्तम भाऊसाहेब ओमासे यांचा समावेश आहे.

-Ads-

अपुऱ्या मनुष्यबळाशी झुंजणाऱ्या आयुक्तालयाने सहाय्यक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, महिला पोलीस हवालदार, पोलीस नाईक, महिला पोलीस नाईक, पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई संवर्गातील 181 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नियंत्रण कक्षातील 143, चाकण मधील तीन, सांगवी पोलीस ठाण्यातील 12, देहूरोड पोलीस ठाण्यातील सहा, चिंचवड पोलीस ठाण्यातील चार आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील 13 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. देहूरोड, एमआयडीसी भोसरी, भोसरी, चाकण, चाकण वाहतूक, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, हिंजवडी, हिंजवडी वाहतूक, आळंदी, दिघी, चिंचवड, वाकड, विशेष शाखा आणि पडताळणी (विशेष शाखा) यामध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)