पिंपरी पोलिसांकडून 10 लाखांचा गुटखा जप्त

पिंपरी – पिंपरी पोलिसांनी 10 लाखांचा गुटखा जप्त करत तीन आरोपींना अटक केले आहे. आठवडाभरातील ही तिसरी कारवाई आहे.

किशोर हरकचंद सुदेंचा (वय-40, संत तुकारामनगर, पिंपरी), गोपाल एकनाथ पाटील (वय-25, रा.भोसरी) किरण शोभाचंद कोठारी (वय-41, रा.चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषध सुरक्षा अधिकारी अरुण धुळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर येथे पिंपरी पोलीस पेट्रोलिंग करत सताना एक पिवळ्या रंगाचा टेम्पो (एमएच 14, सीडी 0992) संशयीतरित्या उभा असलेला दिसला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना टेम्पो मध्ये गुटखा सापडला. यावेळी किशोर याला गोपाल हा गुटखा देण्यासाठी आला होता.त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चिखली येथे गोडावून असल्याचे सांगितले. पोलिसांनी अन्न व औषध सुरक्षा अधिकारी यांच्या मदतीने चिखलीतील स्पाईन रोड येथील गोडाऊनवर छापा मारून गुटखा जप्त केला व किरण याला अटक केले.

यामध्ये पोलिसांनी तंबाखू, सिगारेट, गुटखा असा तब्बल 10 लाख 45 हजार 360 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध सुरक्षा एस. बी.नारागुडे, अरूण धुळे, पोलीस हवालदार राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, राजू काकडे, विवेकानंद सपकाळे, पोलीस नाईक महादेव जावळे, श्रीकांत जाधव, अदिनाथ सरक आदींनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)