ओतूर- पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील श्री सदगुरु सीताराम महाराज विद्यालयातील 1994-95 च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंदात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रोहिदास वेठेकर होते, तर एकनाथ घाडगे, खैरणार, तोतरे, खैरनार मॅडम या शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती. 23 वर्षानंतर आयोजित या स्नेहमेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, शेतकरी, व्यावसायिक आदी सर्व क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली आणि शिक्षण घेतलेल्या विद्यालयाचे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सर्वांनी मदतीचा हात पुढे केला. त्याचप्रमाणे ह्युमॅनिटी फस्ट फाउंडेशन या संस्थेकडून सुजाता कुटे यांच्या सहकार्याने एक्कावन हजार रुपये विद्यालयास देत असल्याचे सांगितले. तसेच सुनील फापाळे यास उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवींद्र खर्गे यांनी तर नियोजन केले. सुधाकर कुटे, सुरेश दुरगुडे, राजेश मोझे, महेंद्र वाळुंज, नीलेश कुटे, भरत डोके, महेश कुटे, महादू कुटे, संतोष बोऱ्हाडे यांनी केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा