पिंपरी पुलावर शालेय बसमुळे वाहतूक कोंडी

पिंपरी – पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर शाळेच्या बस अनधिकृतपणे उभ्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. या पुलाजवळ एक नामांकित शाळा असून शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी सकाळी व दुपारच्या सुमारास पुलावर वाहने उभी असतात. या बसमध्ये चढ-उतार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवितालाही धोका असून पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

पिंपरी कॅम्प परिसरात असणाऱ्या या उड्डाणपुलावरुन चिंचवड, पिंपरी, सांगवी आदी भागात जाण्यासाठी रस्ते असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच, पुलाजवळ असणारी शाळा सकाळी भरत असून दुपारी सुटते. यामुळे, शाळेच्या वेळेत पुलावर उभ्या असणाऱ्या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच, या पुलावर अनधिकृत रिक्षा थांबा असून सरार्सपणे बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाते. याचबरोबर, पुलाखाली भाजी मंडई असून त्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मुख्य पुलावरुनच रस्ता आहे. यामुळे, पादचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पुलावरील अनधिकृत वाहनांमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. तसेच, या पुलावरुन कॅम्पमध्ये जाण्यासाठी एकेरी मार्ग आहे. परंतु, कॅम्पमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येण्यासाठी “नो एन्ट्री’ असूनही नागरिक जीव धोक्‍यात घालून वाहने चालवतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पुलावर अनेक अनधिकृत वाहने उभी असल्याने कित्येकदा अपघात झालेले आहेत. या परिसरात भाजी मंडई, रेल्वे स्थानक, बाजारपेठ असल्याने पादचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु, पुलावरील वाहतूक सुस्थितीत होण्यासाठी वाहतूक पोलीस कोणत्याही अनधिकृत वाहनांवर कारवाई करताना दिसत नसल्याचे, अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)