पिंपरी न्यायालयाच्या न्यायमूर्तींपदी एन. टी. भोसले

पिंपरी – पिंपरी न्यायालयात दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून एन. टी. भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त न्यायमूर्तींनी पदभार स्वीकारला. त्याबद्दल पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांनी नवीन न्यायमूर्तींचे स्वागत केले. न्यायमूर्तींनी न्यायालयीन कामकाजाची माहिती घेतली. अॅडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी तसेच वकिलांशी संवाद साधला. नवीन न्यायालयीन इमारतीची प्रक्रिया गतीमान करण्याबरोबरच अधिकाधिक केसचा निपटारा करण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी मुख्य न्यायमूर्ती के. एम. पिंगळे, न्यायमूर्ती ए. यु. सुपेकर, अॅड. सुनील कड, अॅड. किरण पवार, अॅड. सतीश गोरडे, अॅड. बी. के. कांबळे, अॅड. देवराम ढाळे, अॅड. दिनकर लाळगे, अॅड. जे. के. काळभोर, अॅड. मकरंद गोखले, अॅड. प्रशांत अहिरे, अॅड. हर्षद नढे, अॅड. सागर अडागळे, अॅड. निशांत यादव, अॅड. सुनील माने, सचिव अॅड. गोरख कुंभार, अॅड. शशिकांत गावडे, अॅड. पूनम राऊत, अॅड. सविता तोडकर, अॅड. सारिका परदेशी, अॅड. गजेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. संतोष मोरे यांनी केले. तर आभार अंकुश गोयल यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)