पिंपरी न्यायालयाचे “बिऱ्हाड’ नेहरूनगरला

पिंपरी –महापालिकेच्या नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमयसमोरील इमारत पिंपरी न्यायालयासाठी 5 वर्षे कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. दरमहा 8 लाख 77 हजार 29 रूपये भाडे आकारण्यात येणार आहे. इमारतीचे क्षेत्रफळ 4 हजार 374.43 चौरस मीटर इतके आहे.

मंगळवारी (दि. 4) झालेल्या स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेटस्‌ बार असोसिएशनने पिंपरी न्यायालयासाठी पालिकेकडे इमारतीची मागणी 18 सप्टेंबर 2017 ला केली होती. नेहरूनगर येथील मगर स्टेडिमयसमोर इमारत पालिकेने वाचनालय व दवाखान्यासाठी आरक्षित केली होती. आरक्षणात बदल करून ही इमारत न्यायालयास देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

नेहरूनगरच्या इमारतीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाडे दर मागविण्यात आले होते. या बांधकाम क्षेत्रफळासाठी 8 लाख 77 हजार रूपये भाडे कळविले आहे. त्यानुसार महापालिका भाडे आकारणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. सर्वसाधारण सभेने अंतिम मंजुरी दिल्यानंतर इमारतीचे पिंपरी न्यायालयाकडे हस्तांतरण केले जाईल. दरम्यान, मोशी, बोऱ्हाडेवाडी येथील सेक्‍टर क्रमांक 14 मधील 15 एकर जागेत न्यायालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. ती इमारत तयार होईपर्यंत न्यायालय नेहरूनगरला राहणार आहे.

…तर वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार!
नेहरूनगरच्या पिंपरी न्यायालयात विविध 20 प्रकारचे न्यायालय व खंडपीठ असणार आहेत. त्यामुळे न्यायालयीन कामासाठी वारंवार पुणे शहरात ये-जा करण्याचा प्रवासाचा वेळ व खर्चात बचत होणार आहे. तसेच, न्यायालयीन प्रकरणाचा लवकर निपटारा होण्यास मदत मिळणार आहे. या ठिकाणी मुलबक प्रमाणात वाहन पार्किंगची सोय असल्याने वाहतुक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, असे पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)