पिंपरी-निगडी दरम्यान मेट्रो नामकरण

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते निगडी या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार 253 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) महामेट्रोतर्फे तयार करण्यात आला असून महापालिका सभेने त्यास मान्यता दिली. तसेच, पिंपरी – निगडी दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचे नामकरण पुणे – पिंपरी-चिंचवड मेट्रो करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

मेट्रोची मार्गिका क्रमांक-1 पूर्वी पिंपरीपर्यंतच होती. पहिल्या टप्प्यात ही मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिकेने महामेट्रोला डिपीआर तयार करण्यास सांगितले. महामेट्रोने “सिस्ट्रा’ या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून हा “डीपीआर’ तयार करून घेतला आणि महापालिकेकडे सादर केला. हा “डीपीआर’ गुरुवारी महासभेपुढे सादर झाला. चर्चेअंती त्यास मान्यता देण्यात आली. महापालिका सभेच्या मान्यतेनंतर राज्य आणि केंद्र सरकारकडे तो सादर करण्यात येणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका भवन ते निगडीपर्यंत ही मेट्रो जाणार असून या मार्गाचे एकूण अंतर 4.413 किलोमीटर इतके आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी मेट्रो स्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करणे आणि सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे आदी कामासाठी एक हजार 253 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)