पिंपरी दुमाला तंटामुक्‍तीच्या अध्यक्षपदी सोनवणे यांची फेरनिवड

रांजणगाव गणपती- पिंपरी दुमाला येथील तंटामुक्‍ती गाव समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा युवा उद्योजक संदीप शिवाजी सोनवणे यांची मोठ्या बहुमताने निवड करण्यात आली. पिंपरी दुमाला येथे दि. 13 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये ही निवड करण्यात आली. सोनवणे यांची मागिल वर्षी निवड झाल्यानंतर तंटामुक्‍ती अभियान यशस्वी राबविण्यात आले. त्यामध्ये तंटामुक्‍त गाव समिती स्थापन केली. जनसंपर्क कार्यालय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी सुरू केले. त्याचे उद्‌घाटन रांजणगाव पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी सोनवणे यांच्या कामाचे कौतूक केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी सरपंच गायत्री चिखले, सचिव म्हणून ग्रामसेवक डी. एन. पलांडे यांनी काम पाहिले. याप्रसंगी सोसायटी अध्यक्ष दत्तात्रय चिखले, माजी सरपंच दिलीप खळदकर, उपसरपंच मोहन चिखले, माजी उपसरपंच सुरेश चिखले, कचरदास डोळस, शरद खळदकर, विजय खेडकर, दत्तात्रय शेळके, अमोल चिखले, पोलीस पाटील संतोष जाधव, शाळा समिती अध्यक्ष सुनील सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या कोमल डोळस, मनीषा खेडकर, जयश्री बडदे, चंद्रकांत चिखले व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने सोसायटी अध्यक्ष दत्तात्रय चिखले यांनी सोनवणे यांचा सत्कार केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)